BeatO अनबीटेबल्स: रितेश जैन | माझी HbA1c ची पातळी 11.3% पासून 6.8% पर्यंत खाली आली

54 0
0
(0)

ती केवळ BeatO च्या मदतीनेच आली

रितेश जैन : 35 वर्षे , व्यवसाय : दागिने घडवणे.

टाईप टू प्रकारच्या मधुमेहाचं निदान.
रितेश जैन हे 35 वर्षाचे गृहस्थ बंगलोर मध्ये आपली पत्नी, दोन मुले व आई-वडिलांसोबत राहतात. त्यांचा
दागिन्यांचा व्यवसाय असून त्यांची बंगलोरमध्ये अनेक दुकानं आहेत. ते स्वतःची नियमित तपासणी
करतात त्यातच त्यांना समजलं की त्यांना मधुमेह झालाय.

” 2009 मध्ये मला जेव्हा कळलं की मला टाईप टू मधुमेह झालाय तेव्हा माझं HbA1c 11.3% होतं. मला
सतत कापरं भरायचं, आणि घाम यायचा. माझ्या कुटुंबातील लोक घाबरले आणि त्यांनी मला डॉक्टरांकडे
नेले. मला काही औषध देण्यात आली पण त्यांनी माझी परिस्थिती अजून बिघडली. ते उपचार मला लागू
पडले नाहीत.”

रितेश जैनची जीवनशैली योग्य नव्हती आणि त्याचमुळे त्यांना मधुमेह झाला होता. त्यांना आता
नियमितपणे रक्तशर्करा पातळी तपासण्याचा सल्ला दिला. जेणेकरून त्यांच्या बिघडलेल्या परिस्थितीत
सुधारणा करता येईल.

” मी माझा प्रवास BeatO च्या साह्याने 2018 साली सुरू केला. त्यावेळी मी अशा मार्गाच्या शोधात होतो की
ज्यामुळे मला रक्त शर्करेच्या पातळीवर नजर ठेवता येईल. BeatO ने मला तात्काळ रक्त शर्करा पातळी
बघता येईल असा उपाय मिळाला. माझ्या आरोग्य शिक्षकांनी मला कमी कर्बोदके (carbohydrates) असणारा आहार दिला. मी सहा महिने जवळपास शून्य कर्बोदके असणारा आहार घेतला, ज्याचा मला माझा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी प्रचंड फायदा झाला. मी रोज नियमित ध्यानधारणा करतो, त्यामुळे मी माझ्यावरील ताणाची पातळी कमी करू शकलो.”
श्री रितेश यांना निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आरोग्य शिक्षकाने काही व्यायामाचे नियम घालून दिले काही
गोष्टी नियमित करायला सांगितल्या BeatO च्या साह्याने होणारे परिणाम अतिशय लक्षणीय होते.
अत्यंत निर्धारपूर्वक त्यांनी आपले निर्धारित ध्येय साध्य केले.

” माझी HbA1cची पातळी 11.3% पासून 6.8% पर्यंत खाली आली. माझी उपाशी पोटी ची रक्त शर्करा
पातळी 500mg/dL पासून 120mg/dL पर्यंत खाली आली आहे, आणि माझ्या वरचा ताणही कमी झाला
आहे. आता मला पूर्वीसारखा घामही येत नाही.”

रितेश नी 25 किलो वजन कमी केले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ही वाढला आहे. पूर्वी त्यांना चाळीस
युनिट इन्सुलिन दिले जायचे त्याचे प्रमाण आता शून्यावर आले आहे .
“आता जेव्हा केव्हा माझी रक्त शर्करा पातळी खाली किंवा वर जाते मला माझ्या आरोग्य शिक्षकांकडून
ताबडतोब फोन येतो.”

“त्यांनी मला माझ्यात का बदल घडवायचे आहे त्या मागची कारण सांगितली आणि ते घडवण्यासाठी
मदत केली. BeatO हे डॉक्टर सारखं आहे जे सतत तुमच्या रक्त शर्करा पातळीवर नजर ठेवते. BeatO चे
आरोग्य शिक्षक त्यांचा काम, त्यांची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने बजावतात. ते मधुमेहींना त्यांच्या
या स्थितीतून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी मदत करतात.”

श्री रितेश यांनी असाधारण किंमत आणि धैर्याने त्यांच्या मधुमेहाच्या पातळीवर विजय मिळवला. ते आता
अतिशय आनंदी आणि निरोगी आयुष्य जगत आहेत.
ते म्हणतात,” मी आता वाट बघतोय माझा मधुमेह उलट (Reversal of Diabetec Condition) कधी
होईल”.

ते म्हणतात की मला मधुमेहींना हे सांगायचे की,” मधुमेह हा काही आयुष्यभरासाठी तसाच राहत नाही तर
योग्य जीवनशैली आणि आहारात केलेले बदल यामुळे मधुमेह नियंत्रणात नक्की राहू शकतो”.
श्री रितेश त्यांच्या कामाबद्दल अतिशय उत्कट आहेत. ते गेली 17 वर्षे त्यांचं काम करत आहे आता अधिक
आणि निरोगी झाल्यामुळे ते त्यांचं काम जास्त कार्यक्षमतेने करू शकतात.
” मी दागिने घडवणारा असल्यामुळे मला माझ्या कामात सतत संशोधन करायला आवडतं. आणि त्यात
मला जास्तीत जास्त लोकांना माझ्याबरोबर सहभागी करून घेण्याची पण संधी मिळते. मला अतिशय
उत्साही आणि प्रेरणादायी लोकांबरोबर काम करायचे जे मला माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करू
शकतील. मी माझ्या विषयांवर असणाऱ्या काही मासिकांमध्ये ज्ञानपत्रीकेमध्ये लेखही लिहिले आहेत,
आणि आता मी लवकरच माझं आत्मचरित्रही लिहिणार आहे.”
BeatO App डाऊनलोड करा आणि श्री रितेश जैन यांच्या सारखाच स्वतःचा कायापालट करा.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

We are sorry that this post was not useful for you!

Let us improve this post!

Tell us how we can improve this post?

Leave a Reply